आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९९ मुले बाधित,लसीकरणाबाबत कोणालाच गांभीर्य नाही ; 40 टक्के झाले लसीकरण

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ११ ते २० या वयोगटातील २६९९ मुलं बाधित झाली होती. त्यामुळे शासनाने १२ ते १४ आणि १५ ते १७ या दोन वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, तरीही लसीकरणाकडे या मुलांसह पालकांनीही पाठ फिरवल्याचे समोर आले. जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील ५६ हजार १२६ मुलं असून त्यापैकी ४१ हजार ६४९ जणांनी पहिला तर २२ हजार २२६ जणांनी दुसरा डोस घेतल्याचे समोर आले. टक्केवारी ४० टक्के असली तरी १५ ते १७ वयोगटातील मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले. जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट एप्रिल २०२२ मध्ये आली. त्यात मोठ्या प्रमाणात विविध वयोगटातील हजारो नागरिक कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी सर्वाधिक ४० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तिंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत तरुणांसह ज्येष्ठांना आणि सर्वांनाच हैराण करुन सोडले होते. तसेच त्यानंतर आलेल्या तिसऱ्या लाटेने फारसे कुणाला छळले नाही. मात्र, ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशांना गंभीर स्वरुपाची तर ज्यांनी लसीकरण केले त्यांना सौम्य प्रकारचे लक्षणं जाणवत होती. यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे लसीकरणासाठी दुसऱ्या लाटेत नागरिकांनी गर्दी केली होती. तिसऱ्या लाटे दरम्यान मुलांसाठी लसीकरणाने जोर धरला होता. मात्र, तिसरी लाट ओसरताच लसीकरणाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले आहेत.

प्रश्न – लसीकरण प्रमाण कमी का आहे ? उत्तर – मुलांच्या शाळा बंद असल्याने पूर्वी पेक्षा लसीकरण मंदावले आहेत. तरीही आमच्या वतीने प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि संबंधीत ठिकाणी लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रश्न – लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न? उत्तर – आमच्या वतीने नियोजन सुरु आहेत. शालेय स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊ शकते. त्यामुळे शाळा उघडल्यावर लसीकरण पुन्हा वेग घेईल. प्रश्न – शाळा बंद सह अन्य कोणती कारणे ? उत्तर – काही पालकांसह मुलांमध्येही लसीकरणाबाबत उदासीनता आलेली आहे. त्यामुळे काही जण समोर येत नाहीत. शाळा सुरु झाल्यावर समुपदेशन करु.

जो पर्यंत लसीकरण पुर्ण शंभर टक्के होत नाही, तो पर्यंत येणाऱ्या लाटांना आपण थोपवू शकत नाही. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने आलेली तिसरी लाट कधी आली, कधी संपली कळले नाही. त्यामुळे लसीकरण करुन घेतल्यास फायदाच होतो. त्यामुळे ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीकरण करुन घ्यावे.

लसीकरणात वाढ होत आहेत १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण करण्यात वाढ होत आहेत. आताची आकडेवारी १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांपेक्षा अधिक आहे.दुसरा डोसचे लाभार्थी कमी आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यात १५० केंद्र आहेत. सर्व ठिकाणी लसीकरण सुरू आहे. डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण जिल्हा समन्वय अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...