आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवेतील योगदानाबाबत सत्कार:समाधान शिबिरात २८ नागरिकांनी केले रक्तदान

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण महाराजस्व अभियान योजने अंतर्गत तहसील कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व १ ऑगस्ट महसूल दिन यांचे औचित्य साधून टिंबर भवन येथे विस्तारीत समाधान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी आमदार मदन येरावार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यामध्ये २८ व्यक्तींनी रक्तदान केले. शिबीरात विविध प्रकारचे दाखल्याचे वितरण करण्यात आले, यामध्ये जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखला, कुटूंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्डचे असे एकूण १०४४ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.

यावेळी भरीव आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भाई अमन नरसिंघानी, साधुराम वाधवानी, तालुका कृषी साहित्य विक्रेता संघ यवतमाळ यांचे तर्फे प्रदीप ओमनवार व कमल बागडी यांना सन्मानित करण्यात आले. मौजा हिवरी येथील लोकसहभागातून ३ किलोमीटर पांदन रस्ता खुला करून शेतकऱ्यांना जाण्या-येण्या करीता रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या किरण ससनकर, श्याम चुंगळे, रवी तातू, अभिजित मुरखे, दिगांबर शहारे यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये निवडणूकी मध्ये तृतीयपंथी यांचा सहभाग वाढावा म्हणून निवडणूक ओळखपत्र तसेच संजय गांधी योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनभाऊ येरावार तसेच प्रमुख पाहुणे अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मोफत बीयाणे
जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे प्रेरणेतून एक दिवस बळीराजा सोबत या उपक्रमा अंतर्गत यवतमाळ जिल्हयामध्ये २०१७ पासून ज्या शेतकरी यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोफत बीयाने वाटप करण्यात आले. त्यात ६६ बॅग सोयाबीन, ९४ बॅग कापूस, १८० बॅग तूर या बियाण्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...