आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थराराक घटना:जुन्या वादातून पुसद शहरात अंदाधुंद फायरिंग करत २८ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पथके केली रवाना सात आरोपींच्या समावेशाची शक्यता

जुन्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाचा भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ही खळबळजनक घटना पुसद शहरातील वाशीम मार्गावर रविवारी दुपारी १ वाजता घडली. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. इम्तियाज खान सरदार खान वय २८ रा. अरुण ले-आऊट, पुसद असे मृतकाचे नाव आहे. पुसद शहरातील वाशीम मार्गावर असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये इम्तियाज खान सरदार खान या तरुणाचे एसआर कार एसी रिपेरिंग सेंटर आहे. या कार रिपेरिंग सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे इम्तियाज खान हा रविवारी दुकान उघडून काम करत होता. त्यावेळी दुपारी अचानक दोन युवक दुचाकीने छत्रपती शिवाजी चौकातून वाशीम मार्गाकडे रिव्हॉल्व्हर घेऊन आले.

दरम्यान दुचाकी रस्त्याच्या कडेला लावत त्या दोघांनी थेट इम्तियाज खान या तरुणावर अंदाधुंद फायरिंग सुरू केली. फायरिंग होताच इम्तियाज हा त्याच्या दुकानातून हॉटेल जमजमकडे धावत सुटला. इम्तियाज धावत असतानाही त्या दोघांनी गोळीबार सुरूच ठेवला. प्रत्यक्षदर्शींच्या चर्चेत गोळीबार करताना तीन गोळ्यांमध्ये इम्तियाजच्या छातीवर दोन राउंड व एक राउंड त्याच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या दोन रिव्हॉल्व्हरधाऱ्यांनी जवळपास पाच ते सहा राउंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर त्या दोघांनी पुन्हा शिवाजी चौकाकडे धाव घेत दुचाकी घेऊन पळ काढला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इम्तियाजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीस रुग्णालयात पाठवला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळ गाठले व चौकशीसाठी पथके रवाना केली. त्या पथकातील डीबी प्रमुख दीपक ताठे यांनी आरोपीला हिवरी गावातून मुख्य अल्पवयीन आरोपीस अटक केली. घटनेमध्ये संशयित सात आरोपी असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी
भरदिवसा गोळीबार करत तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी उसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, वसंतनगर पोलिस, शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वाहतूक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान त्या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.

‘ते’ दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुसद-वाशीम मार्गावर दोघांनी इम्तियाज खान या तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केली. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या दृष्टीने पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला करून मुख्य आरोपीस अटक केली आहे. वाशीम मार्गावर घडलेल्या घटनास्थळावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता..

इम्तियाज खानवर शिकार प्रकरणाचा होता गुन्हा
काही दिवसांपूर्वीच जंगली प्राण्याची शिकार व विक्री प्रकरणातही इम्तियाज खानवर गुन्ह्याची नोंद आहे. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यामुळे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याच्यावर अंदाधुंद फायरिंग केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यात विशेष बाब म्हणजे मारेकरी सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...