आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारार्थ दाखल:विजेचा धक्का लागल्याने 29 वर्षीय युवकाचा मृत्यू ; ​​​​​​​टीव्ही सुरू करताना घडली घटना

आर्णी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील पिंपळनेर येथे विजेचा तीव्र धक्का लागून एका २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवार, दि. १० सप्टेंबरला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. देविदास गोविंद राठोड (२९) रा. पिंपळनेर असे मृत युवकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील पिंपळनेर येथील देविदास राठोड हा शनिवारी घरात टीव्ही चालू करण्यासाठी बोर्डात पिन टाकण्यासाठी गेला होता. यावेळी विजेचा तीव्र धक्का देविदास राठोड याला लागल्याने तो घरात पडला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी देविदास याला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी देविदास याला मृत घोषीत केले. देविदास यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत. आर्णी पोलिस ठाण्यात देविदास याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार व्यंकटेश मच्छेवार करित आहे.

बातम्या आणखी आहेत...