आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी सुनावली:पुसदमधील गोळीबारासाठी पिस्तूल पुरवणाऱ्याला 3 दिवस पोलिस कोठडी

पुसद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुखरे चौकात १५ नोव्हेंबर रोजी भर दिवसा विशाल घाटे याच्यावर झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या सर्वत्र खळबळ उडवून टाकणाऱ्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतला आहे. या गोळीबाराच्या सहा दिवसानंतर २० नोव्हेंबरला चौथ्या आरोपीला वाशीम जिल्ह्यातील रुई येथून अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याला २३ नोव्हेंबर पर्यंत ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्यासह पुर्वी अटक असलेल्या तीन आरोपीचीही पोलिस कोठडी २३ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अमन खान समीउल्ला खान (४२) रा. गढी वार्ड असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. महेश उर्फ कीर्ती रामबहादुर रावल, सौरभ नानासाहेब मडके व शेख शाकीर शेख रऊफ या तिघांना घटना घडली त्याच दिवशी अटक करण्यात आले होते. अमन खान याने गुन्ह्यात वापरण्याकरता किर्तीला व त्याच्या एका साथीदाराला पिस्टल दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

सहा दिवसांनंतरही गुन्ह्यात वापरलेली पिस्टल मात्र पोलिसांच्या हाती लागलेली नाही हे विशेष. गुन्ह्यातील इतर आरोपी सुद्धा पोलिसांच्या तावडीत आले नाही.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत यातील एक मास्टर माईंड अमन खान याला जेरबंद केले. कीर्ती रावल हा फरार होत असताना पांढऱ्या रंगाची स्कोडा कार व त्या कारमध्ये अडीच लाख रुपयासह दोन मॅक्झिन सुद्धा असल्याचा दावा विशाल घाटे याच्याकडून केला जात आहे. मुख्य मास्टर माईंड सचिन हराळ हा फरारच आहे.

बातम्या आणखी आहेत...