आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:जगदंबा नगरीत देशी बनावटीचे 12 बोरचे 3 अग्नीशस्त्र जप्त; वसंतनगर पोलिसांची करवाई, दोघांना दोन दिवसांची कोठडी

पुसद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीमधील जगदंबा नगरीत राहणाऱ्या एका युवकाच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी देशी बनावटीचे १२ बोरचे तीन अग्नी शस्त्र जप्त केले. ही कारवाई वसंतनगर पोलिसांनी शुक्रवार, दि. १७ जूनला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे. अश्वीन बाबुसिंग पवार वय ३६ वर्ष आणि सरदार खान अमीरउल्ला खान वय ५२ वर्ष अशी त्या दोघांची नावे आहे.

श्रीरामपूर येथील जगदंबा नगरीत राहणाऱ्या अश्विन पवार याच्या घरामध्ये अग्नि शस्त्र असल्याची गोपनीय माहिती जमादार अशोक चव्हाण, कुणाल मुंडोकार व मुन्ना आडे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल आडे यांच्या मार्गदर्शनात वसंत नगर पोलिसांनी दि. १७ जूनला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून जगदंबा नगरीतील अश्वीन पवार याच्या घरी धाड टाकली. त्यानंतर घराची झाडती घेतली असता, तीन देशी बनावटीचे १२ एमएम बोरचा अग्नि शस्त्रांचा साठा जप्त केला. त्याने अरुण ले-आऊट येथे राहणाऱ्या सरदार खान समीर उल्ला खान याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...