आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी 3 वाघिणी, 7 बछड्यांचे दर्शन; एकाच वेळी एवढे वाघ आणि बछडे दिसल्याची ही पहिलीच घटना

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात गुरुवारच्या सफारीमध्ये सकाळी एकाच वेळी तीन वाघिणी आणि बछडे पर्यटकांना न्याहाळता आले. आर्ची वाघिणीसोबत ३ बछडे, टिटू वाघीण अन् तिचे ४ बछड्यांचे दर्शन झाल्याने पर्यटक हुरळून गेले. पर्यटक अजिंदर सिंग यांनी हे छायाचित्र ‘दिव्य मराठी’साठी दिले.

2019 मध्ये २२ वाघ अभयारण्यात असल्याची माहिती होती. तेव्हापासून एकाच वेळी एवढे वाघ आणि बछडे दिसल्याची ही पहिली घटना असल्याचे पारवा येथील आरएफओ विवेक येवतकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...