आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिव्हायडर फोडल्याने महामार्गावर अपघात होवून आतापर्यंत तब्बल ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे डिव्हायडर फोडणाऱ्यांवर आर्णी व यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या अपघाताचा आढावा घेतला. अपघात कसे कमी करता येतील, त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांना सूचना देण्यात आल्या.
जिल्हा वाहतूक शाखा व इतर उपविभागीय वाहतूक शाखा यांनी राष्ट्रीय महामार्ग ३६१ कळंब ते तुळजापूरकडे जाणाऱ्या हायवे रस्त्यावरील प्राणांतिक अपघाताच्या कारणाचा सखोल अभ्यास केला. अपघात कमी कसे करता येतील, अपघात कशामुळे झाले, गंभीर अपघात कसे रोखता येतील, यासाठी हायवे अधिकारी व वाहतूक अधिकार्यांनी संयुक्तिक सर्वे केला. यंदा आतापर्यंत एकूण ३०२ फॅटल अपघात झाले असून, त्यात ३१८ जणांचे बळी गेले आहे.
त्या अपघाताचा शोध घेण्यात आले. नागपूर ते तुळजापूर रोडवर रस्त्याच्यामध्ये असलेले डिव्हायडर हे काही ढाबा चालक व पेट्रोल पंप चालकांनी त्यांच्या सोयीसाठी फोडले. त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या निर्देशानुसार डिव्हायडर तोडणारे तसेच रस्त्याला नुकसान पोहचविणार्यांविरुद्घ पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के, सपोनि नागेश जायले, सपोनि अमोल सांगळे, साहेबराव राठोड, निर्मल प्रधान, सचिन राठोड, प्रदीप तांबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नऊ गुन्हे नोंदवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.