आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पीएमश्री योजनेतून 32 शाळांची होणार निवड

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिकच्या ६७८ शाळांमधून ३२ शाळांची निवड पीएमश्री योजनेत केली जाणार आहे. या योजनेत निवड झालेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधांसह शालेय संसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांना १५ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर पात्र ठरलेल्या शाळांबाबत जिल्हास्तरीय अभिप्राय नोंदवून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तद्नंतर शासनाचा ग्रीन सिग्नल मिळणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून पीएमश्री स्कूल योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये शाळांच्या पायाभूत सुविधांसह नावीन्यपूर्ण शिक्षण, आणि तंत्रज्ञान, संसाधने आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, आदर्श शाळा निर्मिती केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय प्राथमिक, उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेमधून प्रत्येकी एक, अशा दोन शाळांची तालुकास्तरावर निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने यु-डायसमधील माहितीच्या आधारे शासनाने परिशिष्ट अ आणि ब, असे दोन गट पाडले आहे. परिशिष्ट ब मध्ये केंद्र, राज्य शासनाची पटसंख्या विचारात घेऊन १२८ शाळांची निवड करण्यात आली आहे.

तर परिशिष्ट अ मध्ये पटसंख्येची अट शिथिल केल्यामुळे ५५० शाळांची निवड केली आहे. याबाबत संबधित शाळांना माहिती देण्यात आली असून, पीएमश्री स्कूल योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. यासाठी बुधवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य होते. आता मात्र, शासनाने नोंदणीसाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यात मिळून ३२ शाळांची निवड राज्यस्तरावर केली जाणार आहे. निवड केलेल्या शाळांबाबत जिल्हास्तरावरून अभिप्राय नोंदवून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तद्नंतर शासन शाळांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहे.

अत्याधुनिक सोयी सुविधा देणार
पीएमश्री स्कूल योजनेत निवड झालेल्या शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, आयसीटी सुविधा आणि व्यावसायिक प्रयोगशाळा आदी सुविधा पुरविल्या जाणार आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण शिक्षण सुद्धा दिल्या जाणार आहे. एकंदरीत ह्या योजनेतून आदर्श शाळा निर्मिती केली जाणार आहे

बातम्या आणखी आहेत...