आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जगदंबा, तुळजा स्थापनेला 322 वर्षांचा इतिहास ; पंचपुत्रे घराण्यातील जागृत देवस्थान

उमरखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्नात झालेल्या दृष्टांतानंतर नदी पात्रातुन प्राप्त झालेल्या जगदंबा आणि तुळजा माता मुर्ती एकाच ठिकाणी स्थापित करुन त्यांचा संयुक्त नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा सुमारे ३२२ वर्षांपासून अविरत सुरू आहे. नवरात्री उत्सवादरम्यान आजही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळलेली असते. त्यासाठी उमरखेड येथील पंचपुत्रे घराण्याने पिढ्यानपिढया केलेल्या अविरत प्रयत्नातून ही परंपरा आजही कायम राखली आहे.

येथील पंचपुत्रे घराण्यातील तत्कालीन कुटुंब प्रमुखांस १७ व्या शतकात आई जगदंबा आणि तुळजा माता या दोन्ही देवतांनी स्वप्नात दृष्टांत दिला. त्यात उमरखेड पासून जवळच असलेल्या करोडी गावाजवळ पैनगंगा नदीच्या पात्रात मध्यभागी आम्ही जगदंबा व तुळजा भवानी दोघीजणी तुझ्या घरी येण्याची वाट पाहत आहोत आम्हाला येथून घरी घेऊन जा असा आदेश दिला. दृष्टांत होताच त्यावेळचे पंचपुत्रे घराण्याचे कुटुंबप्रमुख यांनी दृष्टांटामध्ये सांगितल्या नुसार करोडी गावानजीक पैनगंगा नदीच्या पात्रात जावुन नदीच्या मध्यभागी उत्खनन केले. त्यात दोन देवतेच्या मूर्ती निघाल्या.

पंचपुत्रे यांनी भजनी मंडळे, पालखी, पूजेची सामग्री या सर्व तयारीने दोन्ही देवतांची श्रद्धा पूर्वक पूजाअर्चा करुन पालखीमध्ये स्थापना केली. परंतु पालखी धरणाऱ्यांचे पाय नदीच्या पात्राबाहेर निघत नव्हते. तेव्हा त्या ठिकाणी पंचपुत्रे यांना पुन्हा दृष्टांत झाला. त्यात मिळालेल्या आदेशाप्रमाणे हाताची करंगळी कापून पाण्यात रक्त शिंपडले असता पालखी धरणाऱ्याचे पाय पाण्याबाहेर आले. अत्यंत श्रद्धेने या देवतेची स्थापना पंचपुत्रे घराण्याने त्यांच्या तत्कालीन वाड्यातच केली अशी आख्यायिका आहे.नवसाला पावणाऱ्या जागृत देवता अशी त्यांची आजही पंचक्रोशीत ख्याती आहे. नवरात्र उत्सवात पंचक्रोशीतील भाविक येथे मोठी गर्दी करतात.

होमकुंड होत नाही प्रज्वलित
येथील पंचपुत्रे यांच्या घराण्याकडे सुमारे ३२२ वर्षांपासून जगदंबा व तुळजा भवानी यांच्या नवरात्र महोत्सव संयुक्तपणे सुरू आहे. या घराण्यातील सध्याच्या पिढीचे सतीश पंचपुत्रे यांनी त्यांच्या आधीच्या त्रिंबकराव, माधवराव, बाळंभभट, अंबादास इत्यादी कुल पुरुषांनी १७०० सालापासून या देवतांच्या आगमनाची व उत्सवाची परंपरा सुरु ठेवली आहे. या स्थानातील नवरात्रीचे वैशिष्ट असे की, येथे होमकुंड प्रज्वलित केल्या जात नाही.

बातम्या आणखी आहेत...