आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:खडका येथे मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महागाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघ महागाव तालुक्याच्या वतीने जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल खडका येथे मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन विद्यार्थांना शालेय साहित्य, खाऊ वाटप करून तसेच वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच के. जी. २ चा विद्यार्थी मानस खंदारे याचा वाढदिवस जिजाऊ चरित्र हे पुस्तक देऊन साजरा केला.

१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे अभियंता युगपुरुष अड.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. युवकांचे मन, मेंदू, मनगट व मस्तक सशक्त करणाऱ्या या शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवाच्या वैचारिक सामाजिक संघटनेने गेल्या ३२ वर्षापासून मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. आणि खरा इतिहास जगासमोर आणला.मराठा सेवा संघाच्या या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी श्रीकांत देशमुख जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. संदीप शिंदे मार्गदर्शक, विजय देशमुख माजी तालुकाध्यक्ष, अमोल जगताप तालुका सचिव, अवि नरवाडे तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख सदस्य, सुरेखा शिंदे, ममता देशमुख,आरती जील्लरवारबीबाई देशमुख मदतनीस व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...