आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्याज, दंडमाफीचा जिल्ह्यात 37 हजार 224 शेतकऱ्यांनी घेतला लाभ; 24 कोटी 45 लाख रुपयांचा भरणा केला

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महावितरणची योजना, ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास ५० टक्के बिल माफ

जिल्ह्यात शेतीपंपाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. १ लाख १९ हजार ५५६ शेतीपंपांची एकूण थकबाकी १४४७ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. या योजनेद्वारे व्याज आणि दंड माफ करत ८८८ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी झाली. यापैकी आतापर्यंत ३७ हजार २२४ जणांनी २४ कोटी ४५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. कृषी पंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १० दिवस राहिले आहेत. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीज बिल ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम शेतकऱ्यास माफ करण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण १४४७ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीज बिलांपोटी ८८८ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी

त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीज बिलांचा ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे ४४४ कोटी रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार २२५ शेतकऱ्यांनी २४ कोटी ४५ लाख रुपयांचे वीज बिल भरून योजनेचा लाभ घेतला आहे. कृषी बिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

बिल दुरुस्तीसाठी मेळावे : ज्या शेतकऱ्यांची वीज बिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत विविध गावांमध्ये कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तत्काळ कळवण्यात येत आहे. या शिबिरांचा कृषी ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...