आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा जवळपास दोन लाख हेक्टरवर रब्बीची लागवड झाली आहे. त्या अनुषंगाने दोन लाख सात हजार ६७० मेट्रिक टनांचे आवंटन प्रस्तावित होते. आतापर्यंत वाटप केलेले आणि सध्या स्थितीत ३९ हजार ६३९ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. उर्वरित एक लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी जानेवारी महिन्यापासून खतांची आवक सुरू होते.
यंदा रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे खतांचे दर वाढले होते. यावेळी कंपन्यांकडून खतासोबत इतरही खतांचे लिंकिंग च्या घटना घडल्या आहे. खरीप हंगाम हातून गेल्याने यंदा शेतकऱ्यांचे सर्व लक्ष रब्बी वर आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. रब्बीच्या पेरणी जवळपास दोन लाख हेक्टरवर झाली आहे. आता शेतकर्यांना खतांची गरज आहे.
तत्पूर्वी कृषी विभागाने दोन लाख सात हजार ६७० मेट्रिक टनांची मागणी प्रस्तावित केली होती. आतापर्यंत ६७ हजार ७२७ मेट्रिक टन रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले आहे. तर सध्या कृषी केंद्रात ३९ हजार ६३९ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. तरीसुद्धा एक लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा तुटवडा स्पष्ट दिसत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
वातावरणाने वाढली शेतकऱ्यांची चिंता
गेल्या काही दिवसापासून वातावरणात अमुलाग्र बदल निर्माण झाला आहे. याचा फटका हरभरा, गहू, ज्वारी, तुर आदी पिकांना बसत आहे. काही दिवस पडलेली थंडी आता गायब झाली असून, येत्या काळात थंडी पडली नाही, तर शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुद्धा हातून जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.