आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रादेशिक परिवहन विभागात एकूण ९२ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ३९ पदे रिक्त आहेत. यात आरटीओ, मोटार वाहन निरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. दलालांच्या माध्यमातून आरटीओत सर्रासपणे कामे केली जात आहेत. वाहनधारकांची कामे वेळेवर होत नाहीत.
त्यांची प्रचंड परवड होते. अपुऱ्या मनुष्यबळाचा उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने ते हैराण झाले आहेत. जिल्ह्यात वाहन संख्या ५ लाख ६६ हजार २२ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.
याबरोबर नवीन वाहन परवान्यासाठी लेखी परीक्षा घेणे, वाहन चालवणे चाचणी घेणे, परवाना देणे, विविध शुल्क वसूल करणे आदी कामांची जबाबदारी आरटीओ प्रशासनावर सोपवली आहे. कोरोनाकाळातही आरटीओ विभागाने उद्दिष्टांच्या पुढे जाऊन शासनास महसूल मिळवून दिला. आरटीओ कार्यालयात रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी असते. मात्र, ३९ अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे पारदर्शक कामाचा पूर्ण खोळंबा होत असून दलालीला वाव मिळत आहे.
विशेष म्हणजे आरटीओ अधिकारी नसल्याने बेशिस्तपणा वाढीस लागला असून कामाच्या ताणामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर मोठ्या आवाजात बोलत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
अपघात होण्याची शक्यता : आरटीओच्या गेटसमोरच दलालांचा बाजार भरतो. तसेच वाहनधारक कामानिमित्त येतात व बाहेर वाहने उभी करतात. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ट्रॅफिक जाम होते. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येथे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.