आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात दोन आत्महत्या:लोणीत 40 वर्षीय महिलेची, तर आंबेडकर वॉर्डात 23 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या; तरुणाने मानसिक तणावातून संपवले जीवन

आर्णी, पुसद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील लोणी येथील ४० वर्षीय महिलेने तर पुसद शहरातील आंबेडकर वॉर्डातील एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना शनिवार, १९ जूनला उघडकीस आल्या असून, या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. ज्योत्स्ना सुनील राठोड (४०) रा. लोणी असे मृत महिलेचे नाव असून, विशाल उर्फ पप्पू अशोक कांबळे (२३) रा. आंबेडकर वॉर्ड, पुसद असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, आर्णी तालुक्यातील लोणी येथील ज्योत्स्ना राठोड ही महिला अनेक वषार्पासून टीबी या आजाराने त्रस्त होती.

आजाराला कंटाळून तिने गळफास घेतला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिस विभागाच्या वतीने दर्शवण्यात येत आहे. या घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदारे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अनिल राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे. पुसद शहरातील आंबेडकर वॉर्डात विशाल उर्फ पप्पू कांबळे हा आत्या व आजी सोबत राहत होता. लहानपणापासूनच आईवडिलांचे छत्र नसलेल्या पप्पूला कुपोषित आजार जडला होता अशी माहिती शेजाऱ्यांकडून चर्चिल्या जात आहे. यामुळेच तो मानसिक तणावात होता असे सांगण्यात येत आहे. शनिवारी घरात एकटा असतांना विशाल उर्फ पप्पू याने पत्राच्या खांबाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...