आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 172 आत्महत्या:आठ महिन्यात संपवली 40 युवा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांसह खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची ह्या चिंतेत गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल १७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे त्या १७२ शेतकऱ्यांमध्ये ४० जण हे युवा शेतकरी असुन त्यांना आपली जीवनयात्रा संपवण्याची वेळ आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना किती प्रभावी ठरताहेत हे स्पष्ट दिसुन येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. त्यातच आता विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात तब्बल १७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यात ४० युवा शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आत्महत्यांच्या ६६ प्रकरणांमध्ये शासनाची मदत
जिल्ह्यात चालु वर्षात १७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात ६६ शेतकरी पात्र तर ७६ शेतकरी अपात्र ठरले. तसेच ३० आत्महत्या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे पात्र शेतकऱ्यांमध्ये १० युवा तर २१ अपात्र शेतकरी आहे.

या तालुक्यातील युवा शेतकऱ्यांची आत्महत्या
जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मुसाळ, मेटीखेडा, राळेगाव तालुक्यातील सरई, जवळा, चहांद, झाडगाव, महागाव तालुक्यातील पोहडुळ, अंबोडा, तिवरंग, बाभुळगाव तालुक्यातील कोंढा, सुकळी, करळगाव, पालोती, मारेगाव तालुक्यातील टाकळी, आक्कापूर, सिंधी, वेगाव, करणवाडी, यवतमाळ तालुक्यातील वरझडी, बोरजई, केळापूर तालुक्यातील वंजारी, अर्ली, उमरखेड तालुक्यातील खरबी, कुपटी, वणी तालुक्यातील चिखलगाव, धोपटाळा, डोर्ली, गोवारी (पा), दारव्हा तालुक्यातील पांढुर्णा, दिग्रस तालुक्यातील मोख, इसापूर, घाटंजी तालुक्यातील हिरवदरा, सायतखर्डा, आर्णी तालुक्यातील भंडारी, झरी जामणी तालुक्यातील गणेशपूर, या तालुक्यातील ४० युवा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

दोन वर्षापासून बळीराजा चेतना अभियान बंद
शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. २०१५ ते २०२० पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबवण्यात येत होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून ते अभियानदेखील बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...