आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ससेहोलपट:42 गावांचा भार असलेल्या सब स्टेशनची एक वर्षापासून प्रभारी अभियंत्यावर भिस्त

फुलसावंगी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे वीज वितरण विभागात मागील एक वर्षापासून सहायक अभियंता हे पद प्रभारावर आहे. तर येथे कार्यरत असलेले वीज कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याने रात्री अपरात्री आलेल्या वीज ना दुरुस्ती मध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर यापैकी काही कर्मचारी चक्क बनावट कागदपत्रांच्या साह्याने घर भाडे भत्ता उचलत असल्याची चर्चा आहे.

महागाव तालुक्यातील फुलसावंगीमध्ये विजेची समस्या हा काही नवीन विषय राहिलेला नाही. तासंतास वीज पुरवठा खंडीत होणे मेंटेनन्सच्या नावाखाली दिवस भर वीज गुल राहणे ह्या सर्व फुलसावंगी करांच्या रोजच्या दिनचर्येत सहभागी झाले आहे. त्या मागील एक कारण हा फुलसावंगी मध्ये जीर्ण झालेल्या वीज तारे आहेत. ज्यात वारंवार ना दुरुस्त होतात तर हे काम मात्र वेळेवर करण्यासाठी वीज कर्मचारी वेळे वर हजर असणे ही तेवढेच गरजेचे आहे.

तब्बल ४२ गावांना फुलसावंगी येथून वीज पुरवठा केला जातो. ज्यासाठी ८ वीज कर्मचारी संख्या येथे मंजूर आहे. मात्र कार्यरत केवळ ५ कर्मचारी आहेत. मात्र या तोकड्या संख्येत आऊट सोर्सिंग म्हणजेच अतिरिक्त हेल्पर या वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीला उभे करून ही वीज कर्मचाऱ्यांची संख्या बरोबर करण्याचा प्रयत्न वीज विभागाने केला आहे. मात्र अतिव्यस्थ असलेल्या या वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता हा महत्वाचा पद हा प्रभारावर अवलंबून असल्याने इतर वीज सबंधी समस्याना नागरिकांना तोंड द्यावा लागत आहे.

दुसरी मोठी समस्या म्हणजे येथे काही कार्यरत कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ऍलर्जी झालेली दिसते. आज मितीला बोटावर मोजल्या इतके ही कर्मचारी हे फुलसावंगी येथे स्थायिक नाहीत. ते अपडाऊनचा करतात ज्यामुळे रात्री बे रात्री येणाऱ्या समस्या ना निकाली निघण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याची व संबंधित कर्मचारी गावात येण्याची नागरिकांना, शेतकऱ्यांना चातका सारखी वाट पहावी लागते. विशेष म्हणजे येथे सुसज्ज असे कोर्टर होते.

मात्र कोणीच राहत नसल्याने हे कोर्टर आज मोडकळीस आले असून वीज वितरण विभागाची लाखो रुपयांची इमारत आज केवळ स्टोअर रूम झाले आहे कधी काळी येथे आठ ते दहा कुटूंब वास्तव्यास असायचे. एक धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचारी तर अपडाऊनचा करून सुद्धा बनावट कागदपत्राच्या साह्याने चक्क घर भाडे, भत्ता उचलत असल्याची चर्चा वजा माहिती आहे. जो वीज वितरण कंपनीसाठी चौकशीचा विषय ठरू शकतो. शासन दरबारी येथील १३२ केव्हीचा प्रश्न देखील धूळखात पडला असून हा प्रश्न निकाली निघाल्यास फुल सावंगीसह आसपासच्या ४० गावांच्या विजेच्या प्रश्नाला एकाच वेळी मूठमाती देता येईल. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत असलेल्या येथील वीज वितरण व्यवस्थेकडे वरिष्ठांनी जाती ने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

मुख्यालयी राहणे गरजेचे
काही कर्मचारी खोटे कागदपत्राच्या आधार घेत असल्याची बाब माझ्या सुद्धा कानावर आली. कोणी जर मुख्यालयी राहत नसून सुद्धा बनावट कागद पत्राच्या साह्याने घर भाडे भत्ता उचलत असेल तर हे नियम बाह्य असून मी जातीने या विषयाची केवळ चौकशीच करणार नाही तर त्यांच्यावर वेळ प्रसंगी योग्य कारवाई देखील करेल. व्ही. व्ही. चव्हाण, कनिष्ठ अभियंता, महागाव

बातम्या आणखी आहेत...