आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील श्री क्षेत्र उंबरझरा (इं.) येथील हनुमान मंदिर व आश्रमामधील महाराजांची बनावट स्वाक्षरी काढून तब्बल ४३ लाखाने फसवणूक केली. या प्रकरणी श्रीधर बवीराम जाधव वय ३२ वर्ष यांनी पोलिसांत तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे केले आहे. यात प्रमोद देशपांडे, प्राची देशपांडे, अभय चरडे, ओमप्रकाश महाजन, ओजस्वी महाजन, पुजा महाजन, सुधीर चरडे, असे आरोपींची नावे आहेत. यातील काही जण सन २०१२, तर उर्वरीत सन २०१६ पासून दत्तमंदिर, हनुमान मंदिर व आश्रमाशी जुळले होते.
तद्नंतर सहा जण १९ जून २०१८ रोजी ट्रस्टच्या रेकॉर्डवर ट्रस्टी म्हणून नोंदवण्यात आले. तर ट्रस्टच्या दत्तमंदिर, हनुमान मंदिर व आश्रमामध्ये ८५ वर्षीय श्रीराम महाराज वास्तव्यास होते. महाराजांच्या वार्धक्यामुळे ट्रस्टचा संपूर्ण कारभार सात आरोपी सांभाळत होते. आरोपींनी संगनमताने कट रचून महाराजांच्या खोट्या सह्या करून भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ४३ लाख रुपयांचा घोळ केला. यात महाराजांना भेट म्हणून आलेल्या १२० ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, , अनुग्रह दिलेल्या शिष्यांची नोंद केलेली डायरी, महत्वाचे साहित्य, आध्यात्मिक पुस्तके, सीसीटीव्हीचा डेटा, आणि इतर साहित्य चार ट्रकमध्ये भरून चोरून नेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.