आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआय चेकअप मशीन फ्राँन्चायसी (शाखा) देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाच्या पत्नीची तब्बल ४४ लाखाने फसवणूक करण्यात आली. ही घटना शहरातील दर्डा नगर परिसरात दि. १३ मे ते दि. १५ जुन २०२२ दरम्यान घडली होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी बिहार राज्यातील पटना येथील तिघांना ताब्यात घेतले असून आकाश कुमार शिवेंद्र कुमार वय २३ वर्ष, उदीत कुमार मिथलेश कुमार वय २१ वर्ष आणि कौशलेंद्र कुमार लाला कुमार वय २७ वर्ष अशी त्या तिघांची नाव आहे. गुरूवारी या तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रतिमा इंगळे यांचे बँक ऑफ इंडिया खाते असून त्या खात्यातून त्या व्यवहार करीत होत्या. त्याचे पती प्रविण इंगळे समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून कार्यरत असून त्यांनी एसबीआयमधून ४३ लाख रूपयाचे कर्ज घेतले होते. ती रक्कम प्रतिमा इंगळे यांच्या अकाऊंटमध्ये टान्सफर करण्यात आली. प्रतिमा इंगळे यांनी त्यांच्या गुगल अॅपवरून लेन्स कार्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड फरिदाबाद या कंपनीकडे फ्राँन्चायसी (शाखा) करीता सर्च केले. त्यानंतर दि. १३ मे २०२२ रोजी पीडीएफवरून इंगळे यांच्या मोबाईल मेलवरून ऑनलाईन अर्ज पाठविला.
तो मी त्याच दिवशी भरून पाठविला. त्यानंतर इंगळे यांच्या व्हॉट्स अॅपवर पुलकीत कपुर असे नाव व मोबाईल क्रमांक पाठविला. त्यानंतर दि. १७ मे रोजी कपुर यांनी कन्फॉर्मेशन लेटर पाठविले आणि पैसे पाठविण्यास सांगितले. दरम्यान इंगळे यांनी मोबाईल युपीआयवरून ५५ हजार ८०० रूपये आणि पती प्रविण यांच्या मोबाईलवरून ९० हजार पाठविले. त्यानंतर आरटीजीएसमार्फत दि. १८ मे रोजी फ्राँन्चायसी फी म्हणून २ लाख ३६ हजार रूपये अकाऊंटवर फरिदाबाद येथे पाठविले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.