आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:30 तोळे सोन्यासह 5 लाखांची रोकड लंपास; शहरातील बालाजी सोसायटीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्युरिटी गार्डचा निष्काळजीपणामुळे चोरट्यांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडून तब्बल ३० तोळे सोन्यासह पाच लाखांची रोख लंपास केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, दि. ६ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास शहरातील बालाजी सोसायटीतील रंगोली ग्राउंड परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.

शहरातील बालाजी सोसायटीतील रंगोली मैदान परिसरात यशवंत लखानी कुटुंबीयांसह वास्तव्यास असून ते सन २०२० मध्ये लखानी सार्वजनीक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. लखानी यांच्या मुलीकडे बैंगलोर येथे धार्मीक कार्यक्रम असल्याने ते दि. २ सप्टेंबरला दुपारी यवतमाळातून बैंगलोरकडे निघून गेले होते. बैंगलोर जाण्यापूर्वी लखानी यांनी सेक्युरिटी चालक संजय सुरावार यांच्यामार्फत एक सेक्युरिटी गार्ड नाईट ड्युटी करीता नेमण्यास सांगितला होता. त्याप्रमाणे संजय सुरावार यांनी शंकर पोरजेलवार नामक सेक्युरिटी गार्डची त्या ठिकाणी नेमणूक केली. दरम्यान दि. ५ सप्टेंबरला सेक्युरिटी एजन्सी चालक संजय सुरावार यांनी लखानी यांना फोन करीत घराचे मागील दार फोडलेले दिसत असल्याचे सांगितले. त्यावरून यशवंत लखानी यांनी तातडीने नातेवाईक नरेश लखानी आणि राजेश लोहाणा यांना माहिती देत घरी जावून काय घडले जावून पाहण्यास सांगितले. दरम्यान त्या दोघांनी तातडीने लखानी यांचे घर गाठून पाहणी केली असता, किचन आणि बेडरूमचे दार तुटलेले दिसले आणि घरातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडून आढळले. याबाबतची माहिती अवधुतवाडी पोलिसांना देण्यात आली असता, त्यांनी ही लखानी यांच्या घरी येवून पाहणी केली. त्यानंतर दि. ५ सप्टेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास यशवंत लखानी बैंगलोर येथून यवतमाळात कुटुंबीयांसह परत आले.

चांदी अन् काही रोकड चोरट्यांनी तिथेच ठेवली
लखानी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत सोन्याचे दागिने आणि रोख लंपास केली. यावेळी त्या ठिकाणी चांदीचे दागिने आणि काही नोटांचे बंडल देखील त्याच ठेवून होते. मात्र चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि मोठी रोख घेवूनच पळ काढला. त्यामूळे या चोरट्यांचा डोळा सोन्याच्या दागिन्यांसह मोठ्या रकमेवरच होता की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तो सेक्युरिटी गार्ड ड्युटीवर गेलाच नाही
शहरातील बालाजी सोसायटीतील यशवंत लखानी यांनी बैंगलोर येथे जाण्यापूर्वी सेक्युरिटी चालक संजय सुरावार यांना एक सेक्युरिटी गार्ड नाईट ड्युटी करीता नेमण्यास सांगितला होता. मात्र घटनेच्या दिवशी तो सेक्युरिटी गार्ड लखानी यांच्या घरी ड्युटीवर गेलाच नाही. त्यामूळे कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लखानी यांच्या घरात प्रवेश करीत लाखो रुपयांच्या मुद्दे मालावर हात साफ केला.

सराईत चोरट्यांची चौकशी
लखानी यांच्या घरातील चोरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात अवधुतवाडी पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासणीला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर शहरातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली. तर दुसरीकडे एलसीबी पथकाने देखील चोरट्यांच्या शोधात एक पथक तैनात केले असून तेही या प्रकरणातील संशयितांची चौकशी करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...