आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरातील मंडळी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेलेली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून ५० तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि ८० हजाराची रोख असा लाखों रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही खळबळजनक घटना शहरातील बसस्थानक समोरील हरी ओम संकुल बिल्डींगमध्ये दि. १३ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात यवतमाळातील विविध पथक उमरखेडकडे रवाना करण्यात आले आहे. शहरातील हरी ओम संकुलमधील कैलास शिंदे हे लग्न कार्यानिमित्ताने परिवारासह माहुर येथे दि. १३ डिसेंबरला सायंकाळी गेले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी दि. १४ डिसेंबरला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घरी परत आले.
यावेळी शिंदे कुटुंबीयांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला. त्यानंतर घरात जावून बघीतले असता, कपाट फोडलेले आणि संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नुकतेच खरेदी केलेले ५० तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि ८० हजार रुपये असा एकंदरित २८ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती तातडीने उमरखेड पोलिसांना देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान यवतमाळ येथील ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.