आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:बापानेच केला 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी 30 वर्षीय नराधम बापाला ताब्यात घेतले

ढाणकी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नराधम बापाने पोटच्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. ही बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोमवार, दि. २ मे रोजी रात्रीच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी ३० वर्षीय नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.

उमरखेड तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय चिमुकली आपल्या कुटूंबीयासह राहत होती. सोमवारी सहा वर्षीय चिमुकलीजवळ तिचा वडील झोपला होता. मध्यरात्री तिच्या वडिलाच्या अंतःकरणातील सैतान जागा झाला आणि कुबुद्धीने प्रेरित होऊन त्याने स्वतःच्या सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला. काळीमा फासणाऱ्या कृत्याने त्याच्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. याशिवाय त्याने केलेल्या कृत्याबद्दल बाहेर काही वाचता केल्यास तुला जिवाशी मारून टाकील अशी धमकीही दिली.

भीतीपोटी चिमुरडीने सकाळ झाली तरी ही कोणालाही काही सांगितले नाही. कोवळ्या व नाजूक जागेवर झालेली दुखापत ही तिला असह्य होऊ लागली. तिने आईला रात्री घडलेला प्रकार सांगितला. मुलींनी सांगितलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. मात्र वेळीच उपचार करण्यासाठी आईने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यानंतर मंगळवार, दि. ३ मे रोजी रात्री बिटरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...