आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्राँग:60 दिवसांच्या मुदत वाढीने दोषारोप पत्र होणार स्ट्राँग

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील छोटी गुजरी परिसरातील एमपी जयस्वाल (शिवनाथ) वाईन बारमधील गोळीबार प्रकरणातील कुख्यात कवट्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात मकोका दोषारोप पत्र सादर करण्यासाठी विशेष मकोका न्यायालयाने ६० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत त्यांच्या सर्व हालचालींची खबरबात पोलिस गोळा करणार आहे.

शेख अलीम उर्फ कवट्या शेख कलीम, शेख इमरान उर्फ कांगारू शेख शरीफ, रोहित जाधव, नईम खान उर्फ नईम टमाटर गुलाब नबी खान, आदेश उर्फ आद्या खैरकार, साजीद उर्फ रिज्जू सलीम सयानी, अस्लम खान उर्फ मारी अकबर खान आणि नयन सौदागर अशी कवट्या गँगमधील आठ जणांची नावे आहे. कुख्यात गुंड कवट्या गँगने पूर्वनियोजित कट रचून दारूच्या बिलावरून छोटी गुजरीतील बार मालकाशी वाद घातला होता. त्यानंतर बार मालकाला मारहाण करीत शेख अलीम उर्फ कवट्या याने देशी कट्ट्यातून गोळीबार केला होता. त्यानंतर बार मालकाला खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या निदर्शनात एलसीबीने मकोका अंतर्गत कारवाई होण्याकरता प्रस्ताव तयार करीत तो अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली असून कुख्यात कवट्या गँगवर मकोका कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणात मकोका दोषारोप पत्र सादर करण्यासाठी विशेष मोक्का न्यायालयाने ६० दिवसांची मुदत वाढ दिली असून न्यायालयातील आरोपींना आता पोलिस कोठडीत घेतले जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल ३० दिवसांची पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यातील फरार असतांना कुख्यात कवट्या गँगला आश्रय देणाऱ्याची शोधमोहीम राबवून त्यांनाही आरोपी करण्यात शक्यता आहे.

टोळी सदस्यांच्या स्थावर मालमत्तेची होणार चौकशी
गुन्हेगारी क्षेत्रात आल्यानंतर गँग बनविणे आणि अवैध मार्गाने संपत्ती गोळा करण्याचा प्रकार वाढला आहे. असाच काहीसा प्रकार कुख्यात कवट्या गँगच्या सदस्याकडून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे मकोका अंतर्गत कारवाई केलेल्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. या चौकशीत अवैध मार्गाने संपत्ती जमवली असेल तर त्यावर सुद्धा टाच येण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...