आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सुरूवातीला मतदान नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, २३ नोव्हेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला सुरूवात झाली होती. या टप्प्यात सहा हजार ४५ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत २६ हजार २०९ मतदारांची नोंदणी झाली आहे. आता मतदारांना शुक्रवार, ९ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्या अनुषंगाने मतदार यादी नोंदणी कार्यक्रम महिन्याभरापूर्वीच लागला होता. त्या कालावधीत पदवीधरांना नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. प्रशासनाने सुद्धा नोंदणीसाठी पावले उचलले होते, परंतु मतदारांनी नोंदणीसाठी स्वारस्य दाखवलेच नाही. २३ नोव्हेंबरपर्यंत केवळ २० हजार २०९ नोंदणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ही नोंदणी अत्यल्प होती. त्याचदविशी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्यास सुरूवात झाली. तद्नंतर मतदार नोंदणीसाठी दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
त्याचप्रमाणे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय पक्षाने नोंदणीसाठी प्रयत्न केले. आणि प्रशासनाने सुद्धा कंबर कसली होती. या कालावधीत सहा हजार ४५ मतदारांनी अर्ज केले. आतापर्यंत २६ हजार २५४ मतदारांची नोंदणी झाली. जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
उमरखेड तालुक्याचा परफॉर्मन्स चांगला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारांची नोंदणी अत्यल्प झाली. तरीसुद्धा उमरखेड तालुक्यातील परफॉर्मन्स चांगला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी उमरखेड तालुक्यातील झाल्याची माहिती मिळाली आहे. आता येत्या चार दविसांत आणखी किती पदवीधर मतदार नोंदणी करणार ह्याकडे राजकीय नेत्यांच्या आता नजरा लागल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.