आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण:अनुकंपातून 67 जणांना पदस्थापना ; समुपदेशनातून ऑर्डर, 20 कनिष्ठ सहायकांचा समावेश

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी डिसेंबरअखेर काढण्यात येणाऱ्या अनुकंपाधारकांच्या नियुक्ती ऑर्डर ऑगस्ट महिन्यातच निर्गमित केल्या आहेत. कागदपत्र तपासणी अंती ६७ जणांना त्यांच्या सोयीनुसार समुपदेशन घेऊन पद स्थापना देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सेवेतून डिसेंबर अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के पदे अनुकंपातून पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली होती. दरवर्षी साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत अनुकंपधारक उमेदवारांना नियुक्ती ऑर्डर दिल्या जात होती. यंदा मात्र, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रक्रीया राबविण्याबाबतच्या सुचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने १७ ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यावर आक्षेप बोलावण्यात आले होते.

शेवटी २२ ऑगस्ट रोजी अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात आली. पात्र उमेदवारांना बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी समुपदेशनाकरीता जिल्हा परिषदेत बोलावले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. समुपदेशनानंतर कनिष्ठ अभियंता ३, ग्रामसेवक १०, पशूधन पर्यवेक्षक २, सहाय्यक शिक्षक ४, कनिष्ठ सहाय्यक २०, आरोग्य सेवक १०, कनिष्ठ सहाय्यक लेखा ४, परिचर १४, अशा एकूण ६७ जणांना पद स्थापना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही जणांचे वयाची मर्यादा संपुष्टात येणार होती. ही बाब लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यात अनुकंपाधारकांना पद स्थापना देण्यात आली. तर येत्या आठ दिवसांत एकूण २७ परिचर, ६ ग्रामसेवक, ३ कनिष्ठ अभियंत्यांच्या ऑर्डर काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...