आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मूग, उडीद, सोयाबीन खरेदीकरिता जिल्ह्यात फेडरेशनचे 7 हमीभाव केंद्र

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने जिल्ह्यात ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुग, उडीद, सोयाबीनकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महागाव तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरीजामणी बळीराजा फळे- फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद येथील किसान मार्केट यार्ड शेलु (बू.) पुसद, आर्णी तालुक्यातील दत्त रामपूर येथील शेतकरी कृषी खाजगी बाजार समिती, आर्णी, दिग्रस खरेदी विक्री समिती, दिग्रस, बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आदींचा समावेश आहे.

जिल्हयातील मुंग, उडीद, सोयाबीन खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी ४ नोव्हेंबर २०२२ ते शासनाकडून अंतिम मुदतीचा आदेश प्राप्त होईपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांना आधारकर्ड, सातबारा उतारा, पिक पेरा, बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहे. ही कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर देवून मुंग, उडीद, सोयाबीन खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...