आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दीड महिन्यात महाकार्गो’तून 7 लाखांवर उत्पन्न; कर्मचाऱ्यांच्या साह्याने मागणीनुसार ही सेवा पुरवण्यात येतेय

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपामुळे मोठ्या प्रमाणात बसेस जागेवरच उभ्या होत्या. त्यात महा कार्गो या मालवाहतूक सेवेचाही सहभाग होता. मात्र, एप्रिल महिन्यापासून मालवाहतूक सुरळीत झाल्याने कर्मचाऱ्यांच्या साह्याने मागणीनुसार ही सेवा पुरवण्यात येत होती. त्यानुसार दीड महिन्यात यवतमाळ विभागाला सात लाख २० हजार ७९० रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे समोर आले. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करत काम बंद आंदोलन पुकारले होते. यामुळे सर्व बसेस आगारातून उभ्या असल्याने सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यातच खासगी वाहन चालकांनी खुलेआम लुटमार सुरु केली होती.

त्यामुळे बस बंद असल्याने अगोदरच हैराण झालेल्या नागरिकांची थेट पिळवणूक सुरु झाली होती. सहा महिन्याच्या काळात शासनाकडून वारंवार देण्यात आलेल्या डेडलाईन, कारवाया यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार कामावर आले होते. त्यांच्या माध्यमातून अनेक मार्गावर बस सेवा सुरु करुन सुविधा देण्यात येत होती. त्यामुळे नागरिकांना काही मार्गावर दिलासा मिळत होता.

दरम्यान महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले. त्यामुळे हळूहळू प्रवासी सेवा आणि वाहतूक व्यवस्था पूर्ववत होत आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात विभागाला तीन लाख ३८ हजार ५४५ रूपयांचे उत्पन्न मिळाले तर ११ मे पर्यंत तीन लाख ८२ हजार २४५ रूपये असा दीड महिन्यात सात लाख २० हजार ७९० मालवाहतुकीतून महामंडळाला मोठा महसूल मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...