आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परत एकदा टिक टिक:जिल्ह्यात 70 टक्के ‘ईटीआयएम’ बंद; वाहकांच्या हाती पुन्हा तिकीट ट्रे, हँग, बॅटरी चार्जिंग, की-पॅड टच न होण्याच्या तक्रारी वाढल्या

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात एक हजार ५४ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन (ईटीआयएम) आहेत. मात्र, बॅटरी चार्जिंग व की-पॅड टच न होणे, वारंवार हँग होऊन काम न करणे या कारणांनी ७५६ अर्थात ७० टक्के ईटीआयएम बंद आहेत. म्हणून वाहकांच्या हातात पुन्हा तिकिट ट्रे देण्याची वेळ आली आहे.

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांना पूर्वी मॅन्युअली ट्रे च्या माध्यमातून तिकीट दिल्या जात होते. मात्र, बहुतांश वेळा तिकीट घेताना प्रवाशी चलाखी पणा करीत होते. परिणामी, एसटी महामंडळाला वर्षाकाठी लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने ईटीआयएम मशीनच्या सहाय्याने तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार लाखो रूपये खर्चून मशिन खरेदी करून प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, बऱ्याचवेळा मशिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांची तिकीट देण्याच्या अडचणीत भर पडत होती. गेल्या काही वर्षांत हजारो मशिनमध्ये बिघाड झाला. काही दुरूस्त करून वापरात आणण्यात आल्या, परंतू अवघ्या काही दिवसांतच ह्या मशिन पुन्हा बंद पडत होते.

जिल्ह्यातील सर्वच आगारात बस संपामुळे बंद होत्या. तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ईटीआय मशीनचा या काळात वापर झाला नाही. आता सध्या ७० टक्के मशीन नादुरुस्त आहेत. मशीनवर एका बटणावर रिपोर्ट मिळतो. मात्र, रस्त्यात हे मशीन बंद पडल्यास वाहकांना पुन्हा तिकीट ट्रेचा वापर करावा लागतो. यामुळे टिकीट ट्रे देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...