आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:वृद्धाची 70 हजाराने फसवणूक ; 2 जूनला गुन्हा नोंद करण्यात आला

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक आणि दलालाने मिळून एका सेवानिवृत्त वृद्धाची ७० हजाराने फसवणूक केली. ही घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या सप्तशृंगी नगरात घडली असून या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात नागपुरातील दोघांवर गुरूवार, दि. २ जूनला गुन्हे नोंद करण्यात आले. प्रकाश मनवर आणि अश्वीन लाडगे दोघेही रा. नागपूर असे गुन्हे नोंदवण्यात आलेल्या ग्राहक आणि दलालाचे नाव आहे. या प्रकरणी विश्वनाथ पराते वय ७० वर्ष रा. बोरी अरब यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, बोरी अरब येथील पराते एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून मिळणाऱ्या पेन्शनवर ते कुटूंबीयांचा उरदनिर्वाह करीत आहे. विश्वनाथ पराते यांचे यवतमाळातील सप्तशृंगी नगरात दोन प्लॉट असून आर्थीक अडचणीमुळे त्यांनी ते प्लॉट विक्रीस काढले होते. याबाबत मुलगा अमोल पराते याने ऑनलाईन वेटसाईटवर प्लॉटची माहिती प्रकाशीत केली. दरम्यान दि. २५ मे रोजी नागपुरातील बंडु मानकर नामक व्यक्तीचा पराते यांना फोन आला. त्यावेळी मानकर नामक व्यक्तीने प्लॉट बघायला येतो म्हणून दुसऱ्या दिवशी दि. २६ मे रोजी यवतमाळ गाठले. यावेळी विश्वनाथ पराते यांना बंडु मानकर याने दलाल असल्याचे सांगितले आणि सोबत असलेले अश्वीन लाडगे हे ग्राहक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बंडु मानकर याने प्लॉटच्या किंमतीबाबत विचारपूस केली असता, पराते यांनी ९०० रूपये भाव सांगितला. त्यावेळी मानकर याने १००० रूपये भावाने दोन्ही प्लॉट विक्री करून देतो, १०० प्रमाणे एक लाख ८० हजाराची रोख कमिशन म्हणून मागितली. त्यावेळी पराते यांनी बंडु मानकर याला होकार दिला. दरम्यान ग्राहक अश्वीन लाडगे याला प्लॉट दाखविण्यात आले आणि त्या ठिकाणी व्यवहार झाले. यावेळी टोकन म्हणून लाडगे यांनी पराते यांना दोन लाखाचा चेक दिला. यावेळी मानकर याने कमिशन म्हणून ३५ हजार रूपये पराते यांच्याकडून घेतले. तसेच प्लॉटचे कागदपत्रांची झेरॉक्स घेतली. त्यानंतर तो चेक पराते यांनी डिपॉझीट केला. त्यानंतर बंडु मानकर आणि पराते बोरी अरब या गावी आले, त्या ठिकाणी पुन्हा ३५ हजार रूपये मानकर याला कमिशन म्हणून दिले.

बातम्या आणखी आहेत...