आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत तक्रार:दागिने चमकवून देतो म्हणत 76 ग्रॅम सोने केले लंपास

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याचे दागिने चमकवून देतो म्हणत एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या पत्नीचे ७६ ग्रॅम दागिने लांबवून फसवणूक करण्यात आली. ही घटना शहरातील विठ्ठलवाडी मार्गावरील गणेश नगर येथे सोमवार, दि. २१ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली.शहरातील गणेश नगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव वानखडे यांची पत्नी उज्वला या शेजारी राहणाऱ्या महिलेसह घरी गप्पा करीत बसल्या होत्या.

यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले, आम्ही गुजरात येथील उजाला शाईन कंपनीतून आलो असल्याचे सांगत घरातील स्टाईल, भांडी, दागिने पॉलिश करून देतो, असे म्हणाले. त्यानंतर प्रात्यक्षिक करून देत विश्वास संपादन केला. त्यानंतर चार सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची अंगठी, दोन कानातले वेल, दोन कानातले वेल असे एकूण ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत २ लाख ७६ हजार रूपयांचे पॉलिश करण्यासाठी देण्यात आले.

यावेळी त्या दोघांनी संपूर्ण दागिने स्टीलच्या डब्यात टाकले दरम्यान उज्वला वानखडे यांना पिण्याचे पाणी मागितले, पाच मिनिटानंतर तुमचे दागिने काढून घ्या, आम्ही बाहेरून कंपनीचे काम करून येतो, म्हणत निघून गेले. पाच दहा मिनिटानंतर डब्यातील पाणी काढून पाहीले असता, दागिने आढळून आले नाही.

अॅडमिशनच्या नावाखाली सव्वातीन लाखाने फसवले
मुलाच्या अॅडीमिशनच्या नावाखाली एका पालकाची नागपूर येथील कौन्सिलर महिलेने सव्वा तीन लाखाने फसवणूक केली. ही घटना दि. १ सप्टेंबर ते दि. २४ ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी पालक मुकुंद पेन्शनवार रा. दहिवलकर ले-आऊट, यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी नागपूर येथील कौन्सिलर प्रिया सावंत या महिलेवर फसवणुकीचे गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बिलवाल करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...