आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खात्यात पैसे वळते:78 हजार 829 लाभार्थींना मातृवंदनाचा लाभ

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ८२९ महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. आतापर्यंत ७८ हजार ८२९ लाभार्थ्यांना ३१ कोटी ४१ लाख ४९ हजार रुपये मातांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मातांना गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये देण्यात येतात. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार, तिसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात.

यासाठी दीडशे दिवसांच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला, माता कुपोषित राहतात. त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर सुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे पुढे आले होते. माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला, स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना राज्यात जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभागाने सुरू केली आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०१७ ते आतापर्यंत ७८ हजार ८२९ लाभार्थीची नोंद होऊन आतापर्यंत ३१ कोटी ४१ लाख ४९ हजार रुपयांची गरोदर मातांना लाभ देण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांनी केले.

तांत्रिक अडचणीने झाला विलंब
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मातांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येते. मात्र, या सुविधेत काही महिन्यांपासून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर होताच आरोग्य प्रशासनाने ३६ तासांत एक कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम लाभार्थी मातांच्या बँक खात्यावर वर्ग केली.

बातम्या आणखी आहेत...