आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु कोविड १९ पासून जिल्ह्यातील आठ हजार ८८६ आवेदन पत्र जिल्हा बांधकाम अधिकाऱ्याकडे प्रलंबित असल्याने बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले आहेत. विविध योजनेअंतर्गत १७ हजार ७८२ लाभार्थींनी अर्ज केलेले आहे त्यापैकी सात हजार १४७ अर्ज मंजूर करण्यात आले तर एक हजार ७३४ अर्ज नामंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना पाल्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरवर्षी ५ हजार तर अकरावी, बारावी साठी दरवर्षी १० हजार, पदवीसाठी २० हजार, वैद्यकीय,अभियांत्रिकी शिक्षणासाठी ६० हजार ते १ लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विविध योजनेनुसार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज २०१९ पासून दाखल केलेले आहेत. तसेच २०१९-२०२०,२०२०-२०२१,२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात देखील शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाईन आवेदन पात्र सादर केलेले आहेत परंतु जिल्हा कार्यालयाकडून या आवेदन पात्रांची पडताळणी मागील २ वर्षांपासून करण्यात आलेली नसल्यामुळे सदरील अर्ज प्रलंबित पडलेले आहेत. जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडे शिष्यवृत्ती, तसेच इतर योजनेनुसार सतरा हजार ७८२ आवेदन पत्र दाखल झालेले असून त्यापैकी सात हजार १४७ अर्ज मंजूर करण्यात आले तर १ हजार ७३४ अर्ज चुकीचे कारण पुढे करून थेट नाकारण्यात आलेले आहे. सध्या विविध शिष्यवृत्तीचे आठ हजार व इतर योजनेचे ८ हजार ८८५ अर्ज जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाकडे प्रलंबित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.