आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी नसणे खातेदारांना भोवले आहे. याशिवाय डेटा एन्ट्रीमध्ये तहसील स्तरावर चुका झाल्याने तब्बल ८६ हजार खातेदारांना योजनेचा बारावा हप्ता मिळालेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाद्वारे जानेवारीमध्ये दोन हजार रुपयांचा ११ हप्ता एक लाख २ हजार ३८१ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ६८ हजार शेतकऱ्यांना बारावा हप्ता देण्यात आलेला आहे. यामध्ये तब्बल ८६ हजार ०५८ शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप या खातेदारांनी केला आहे.
या योजनेचा पहिला हप्ता ३ लाख ३७ हजार ४१४ शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर आता बारावा हप्ता फक्त ६८ हजारावर खातेदारांना देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करणे संबंधित खातेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी पाचवेळा मुदत वाढही देण्यात आली होती. तसेच या प्रक्रियेशिवाय बाराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही कानाडोळा करणे आता खाते धारकांना भोवले आहे. आतापर्यंत ८६ हजारावर खातेदारांनी ई-केवायसी केली नसल्याची माहिती आहे. अद्याप ज्या शेतकरी खातेदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना योजनेच्या तेराव्या हप्त्याचा लाभही मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या या लाभार्थी शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले केवायसी करावे, असे आवाहन केले आहे.
प्रशासकीय तांत्रिक घोळाचाही फटका खातेदारांच्या जमिनींसंदर्भातील माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये खातेनंबर, सर्व्हेनंतर व शेतीचे क्षेत्रफळाची अद्यावत माहिती भरण्याची प्रक्रिया तहसील स्तरावर करण्यात आली. काही खातेदारांच्या माहिती मध्येही त्रुटी आहेत. याशिवाय कोड नंबरही चुकीचे टाकल्याने ते खातेदार १२ व्या हप्त्याला मुकल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे आपले पंतप्रधान किसान योजनेचे खाते केवायसी करुन घ्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.