आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:हंगामी वसतीगृहांसाठी 9 प्रस्ताव दाखल

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांच्या पाल्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या हंगामी अनिवासी वसतीगृहांसाठी आतापर्यंत केवळ ९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावाची पडताळणी केली जात असून, प्रस्तावात परिपूर्ण कागदपत्रे दाखल केलेल्या हंगामी अनिवासी वसतिगृहाला हिरवी झेंडी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत वसतिगृहाला मान्यता देण्यात येणार असल्याबाबतची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील अनेक मजूर रोजगाराच्या दृष्टीने परजिल्ह्यासह इतर राज्यात सुद्धा जातात. अशा परिस्थितीत त्यांचा पाल्य शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. असा कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने हंगामी निवासी वसतीगृह सुरू करण्याबाबतचे आदेश दिले होते. शिक्षण परिषदेचे २६ नोव्हेंबर रोजी पत्र प्राप्त झाले असून, त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना हंगामी अनिवासी वसतीगृहांसाठी प्रस्ताव सादर करावे, असे आदेश दिले होते.

दिलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्याभरातून ९ प्रस्ताव समग्र शिक्षाकडे प्राप्त झाले आहे. यामध्ये उमरखेड ६, पुसद दोन आणि महागाव एक, अशा एकूण ९ प्रस्तावाचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची पडताळणी सर्वशिक्षाच्या वतीने केल्या जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्प प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले आहे. ह्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये ह्याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. वसतीगृहात प्रत्येक मुलांमागे सहा हजार रूपये सहा महिन्याकरिता अनुदान देण्यात येते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रत्यक्षात वसतिगृहांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...