आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे संकल्पनेतून मागील सात वर्षांपासून भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रयोजकतेतुन छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीद्वारा शिवचरित्रावर आधारित शिवसामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन शहरासह महागाव व पुसद तालुक्यातील काही शाळांवर होत असते. दि. ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या शिवसामान्य ज्ञान परीक्षेत एकूण ९ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. इयता ४ ते ७ अ गट सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान व इयत्ता आठवी ते बारावी ब गट सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान दोन गटात सदर परीक्षा घेण्यात आली होती.
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे अध्यक्षतेत परीक्षेचा उद्घाटन सोहळा कोषटवार दौ. विद्यालयाचे अध्यक्ष राजेश कोटलवार यांचे हस्ते शाळेत छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पार पडला. छत्रपती शिवरायांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त शिव सामान्य ज्ञान परीक्षेद्वारे शिवरायांचे चरित्र घराघरात पोहोचवण्याचा समितीचा मानस असल्याचे मत शरद मैंद यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
तर कोषटवार दौ.विद्यालयाचे अध्यक्ष राजेश कोटलवार यांनी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिव विचाराचे कौतूक करीत विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा इतिहास परीक्षेद्वारे अभ्यासला जात असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अनिरुद्ध पाटिल मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप, नितीन पवार, प्रा. अजय क्षीरसागर, मुख्याध्यापक प्रा. सुरेश धनवे, उपमुख्याध्यापक गजानन वायकुळे, भारत जाधव, सुधीर देशमुख, सुशांत महल्ले उपस्थित होते. सदर परीक्षेदरम्यान पुसद अर्बन बँक, भारती मैंद पतसंस्थेचे कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सीलबंद प्रश्नपत्रिकेचे पाकिट दोन विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनिशी फोडण्यात आले.परीक्षा ही ओएमआर शीट प्रकारातून पार पडली.सदर परीक्षेच्या यशस्वीतेसाठी शिवसामान्यज्ञान परीक्षा समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे, समिती सदस्य प्रा. अजय क्षीरसागर, अमोल शिंदे, नागेश जोगदे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.