आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरगुती सोयाबीन बियाण्यांमुळे 90 कोटींची बचत; जिल्ह्यात गेल्यावर्षी 90 हजार क्विंटल घरच्या बियाण्याचा पेरणीसाठी वापर

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० मध्ये सोयाबीन कापणी व काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होता. तसेच उपलब्ध बियाण्यांचे भाव सुद्धा वाढले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर केला होता. घरचेच बियाणे वापरल्यामुळे मागील वर्षी पेरणी झालेल्या १ लाख ५० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांपैकी सुमारे ९० हजार क्विंटल घरगुती बियाण्यांचा वापर झाला होता. यामुळे २०२१ मध्ये शेतकऱ्यांची सुमारे ९० कोटी रुपयांची बचत झाल्याचे कृषी विभागाच्या निरीक्षणात समोर आले आहे.

काही वर्षांपासून खरिपातील प्रमुख पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. मात्र, सलग दोन ते तीन वर्षांपासून ऐन कापणी व काढणीच्या काळातच अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सोयाबीन ओले होणे, कधी कधी तर शेतातून सोयाबीन घरीसुद्धा आणावे लागत नाही, अशी परिस्थिती होती. सोयाबीनला पाणी लागल्यानंतर ते पेरणीयोग्य राहत नाही, अशीच परिस्थिती २०२० मध्ये उद्भवल्यामुळे २०२१ च्या पेरणीसाठी बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवला होता. तसेच सोयाबीन बियाणे तीन वर्षांपर्यंत पेरणी करता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.

त्या आवाहनाला प्रतिसाद व बाजारात असलेला बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता शेतकऱ्यांनी २०२१ मध्ये पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांपैकी ४५ टक्के घरगुती बियाणे वापरले होते. घरगुती बियाणे पेरण्यापूर्वी शेतकरी एकदा, दोनदा त्या बियाण्यांची घरीच उगवण क्षमता तपासणी करु शकतो, त्यामुळे शेतात बियाणे पेरल्यानंतर बियाणे उगवले नाही, असे होण्याची शक्यता क्वचितच राहते. आर्थिकदृष्ट्या मोठी बचतही होते.

बातम्या आणखी आहेत...