आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळपासून मतमोजणी:आज ठरणार जिल्ह्यातील 93 ग्रामपंचायतींचे कारभारी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ६४९ सदस्यांसाठी रविवार, १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्हाभरातील ८१.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मंगळवार, २० डिसेंबरला सकाळपासून १३ तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच ९३ ग्रामपंचायतीचे कारभारी ठरणार आहेत.

जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील १०, आर्णी ७, झरी जामणी ४, मारेगाव ९, उमरखेड ४, नेर एक, दारव्हा ८, घाटंजी ४, यवतमाळ १५, राळेगाव ८, दिग्रस ५, वणी १७, बाभुळगाव एक, अशा एकूण ९३ ग्रा.पं.त रविवारी मतदान पार पडले.

एकूण ९३ सरपंच आणि ६४९ सदस्य निवडीसाठी ३९ हजार ३७८ महिला आणि ४३८५६ पुरुष, असे मिळून ८३२३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, मंगळवार, २० डिसेंबर रोजी सकाळपासून तेराही तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच ९३ ग्रामपंचायतीचे कारभारी ठरणार आहे. यंदा मतदारांमधूनच सरपंचाची निवड होणार होती. त्यामुळे निवडणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...