आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:९५ टक्केवाले विद्यार्थीही आयटीआयच्या रांगेत; पहिल्या फेरीत १४६३ प्रवेश

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आयटीआय आणि डिप्लोमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी आयटीआयला विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धडपड सुरू आहे. शहरातील आयटीआयमध्ये पहिल्याच फेरीत एक हजार ४६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. यावर्षी आयटीआयच्या प्रवेशासाठी ९० ते ९५ टक्के असलेले विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.

रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने अनेक विद्यार्थी दहावीनंतर आयटीआयला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यामुळे काही जागा रिक्त होत्या. यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआयला प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील २१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ४ हजार २०० जागा आहे. आत्तापर्यंत ११ अर्जांचे इन्फर्मेशन करण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ३० तारखेपासून विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीआयमध्ये पहिल्याच फेरीत एक हजार ४६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. गुणवत्ता यादीतील विद्यार्थी प्रवेश घेत आहे. यावर्षी आयटीआयच्या प्रवेशासाठी ९० ते ९५ टक्के असलेले विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. या शिवाय विद्यार्थिनींची संख्या देखील अधिक आहे.

या ट्रेडला आहे पसंती : विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर, वायरमन अशा ट्रेडला अधिक पसंती आहे. शासकीय आयटीआयमध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी शनिवार, दि. ६ ऑगस्ट रोजी जाहिर झाली. त्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत, अशी माहिती प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी दिली. दरम्यान, एकीकडे आयटीआयला पसंती आहे.

बातम्या आणखी आहेत...