आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात वाढले यंदा 97 अवघड क्षेत्र

यवतमाळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदा अवघड क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या २२० अवघड क्षेत्र असून, गतवर्षी १२४, तर यंदा ९७ ने वाढ झाली. यातील एक शाळा बंद झाली आहे. संवर्ग एक आणि दोनच्या शिक्षकांना सोमवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित झाले आहे. अशात शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रिक्त पदाची यादी जाहीर केली. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रसुद्धा घोषित केले आहे. विशेष म्हणजे संवर्ग एक आणि दोनमधील शिक्षकांचा अर्ज भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.

तत्पूर्वी अवघड क्षेत्राची यादी सुद्धा घोषित करण्यात आली आहे. जिल्ह्यात गत बदलीच्या वेळी १२४ अवघड क्षेत्र होते. यंदा एसटी महामंडळ, वन, दुरसंचार विभाग, महसूल, आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवघड क्षेत्रातील गावांची निवड केली. त्यानुसार ९७ ने वाढ झाली असून, सध्या २२० वर अवघड क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अवघड क्षेत्रात कर्तव्य बजावलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राउंड २८ ते ३१ जानेवारी २०२३ ह्या कालावधीसाठी शिक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे. आणि अवघड क्षेत्रात राहिलेल्या जागा भरण्यासाठी दि. एक ते ४ फेब्रुवारी कालावधीत सॉफ्टवेअर बदली प्रक्रिया राबवणार आहे. दरम्यान, संवर्ग एक आणि दोनमधील शिक्षकांना आता रविवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पर्यंत लॉगीन आयडीवर ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.

फेब्रुवारीपर्यंत चालणार बदली प्रक्रिया
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता नव्याने शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ही प्रक्रिया पूर्णता: फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष पूर्णपणे बदल्यांचे विचारातच गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...