आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बफरस्टॉक:जिल्ह्यात 970 मेट्रिक टन खताचा बफरस्टॉक उपलब्ध ; तुटवडा नाही; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या ९७० मेट्रिक टन बफरस्टॉक उपलब्ध आहे. केवळ एकाच खतांची मागणी शेतकऱ्यांनी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होणार आहे. त्या अनुषंगाने बी बियाणे, खतांचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वेळोवेळी कृषी विभागाची बैठक घेतली. कंपन्यांना सूचना दिल्या. नियोजनानुसार सर्व कंपन्यांना बफरस्टॉक उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. ज्या कंपन्यांनी बफरस्टॉक विहित मुदतीत उपलब्ध करून दिला नाही, अशा कंपन्यांना नोटीस सुधा बजावली होती. तद्नंतर कंपन्यांनी झुकते माप घेत बफरस्टॉक उपलब्ध करून दिला. आता मृग नक्षत्र लागले असून, शेतकरी बी बियाणे, खते घेत आहे. परंतु खतांचा तुटवडा असल्याची अफवा पसरवत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ९७० मेट्रिक टन खत बफरस्टॉक उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...