आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस थांबला:पश्चिम विदर्भात मोठ्या प्रकल्पात 99.40% साठा‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीचा पाऊसही निघुन गेल्या नंतर‎ पश्चिम विदर्भातील नऊ पैकी चार‎ मोठ्या प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.‎ दरम्यान मोठ्या नऊ प्रकल्पात साठवण‎ क्षमतेच्या ९९.४० टक्के जलसाठा‎ उपलब्ध झाला आहे. जुलैअखेर‎ पासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने‎ प्रकल्प तुडूंब भरले तर परतीच्या पाऊस‎ जाेरदार बरसला. हजारो हेक्टर‎ जमिनीवरील पिकांची हानी झाली. तर‎ परतीच्या पावसापूर्वीच प्रकल्पांनी १००‎ टक्के पातळी गाठल्याने पश्चिम‎ विदर्भातील मोठे, मध्यम आणि लघु‎ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. मात्र गेल्या‎ पाच ते सात दिवसांपासून परतीचा‎ पाऊसही थांबला आहे.

मात्र अद्यापही‎ पश्चिम विदर्भातील मोठ्या नऊ पैकी‎ पाच प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.‎ केवळ विसर्ग कमी झाला आहे.‎ अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा‎ प्रकल्पाचे दोन दरवाजे ५ सेटींमीटरने‎ उघडले असून, यातून १६ घनमीटर‎ प्रतिसेकंद, यवतमाळ जिल्ह्यातील पुस‎ प्रकल्पाच्या सांडव्यावरुन ३ सेंटी‎ मीटरने २.४१ घनमीटर प्रतिसेकंद,‎ बेँबळा प्रकल्पाचे २ गेट पाच‎ सेंटीमीटरने उघडले असून, यातून १०‎ घनमीटर प्रतिसेकंद, बुलडाणा‎ जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे ३‎ दरवाजे १० सेंटी मीटरने उघडले असून,‎ यातून ९९ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग‎ सुरू आहे. विसर्ग सुरू असल्याने या‎ विसर्गचा कोणत्याही गावाला फटका‎ बसण्याची शक्यता नाही. दरम्यान १४‎ मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे.‎ मोठ्या प्रकल्पात ९९.४० टक्के‎ साठा : पश्चिम विदर्भातील नऊ‎ मोठ्या प्रकल्पांमुळे १३९९.९१ दशलक्ष‎ घनमीटर साठवण क्षमता निर्माण झाली‎ आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे‎ नऊ पैकी ८ प्रकल्प १०० टक्के भरले‎ असून, प्रकल्पात १३९१.५१ दशलक्ष‎ घनमीटर (९९.४० टक्के) जलसाठा‎ उपलब्ध झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...