आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:आमदरीच्या घाटातील जंगलात 19 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या

पुसद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९ वर्षीय तरुणाची गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आमदरी घाटातील जंगलात सोमवार, दि. ५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गजानन बंडू ढोले वय १९ वर्ष रा.मांडवा असे मृत तरूणाचे नाव आहे. चालु वर्षात जिल्ह्यात ५३ हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुसद तालुक्यातील मांडवा येथील गजानन ढोले हा त्याच्या मामाच्या घरी नांदेड जिल्ह्यातील ईरापुर येथे दि. ४ सप्टेंबरला गेला होता. त्यानंतर तो त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मांडवा येथील घरी येण्यासाठी आमदरी घाटातून निघाला होता. अश्यात दुसऱ्या दिवशी गजानन याचा मृतदेह आमदरी घाटातील जंगलात धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी तातडीने खंडाळा पोलिसांना याबाबत कळविले.

शेततळ्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहरा ईजारा येथील शेत शिवारातील बंधाऱ्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. ही घटना दि. ४ सप्टेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गाव परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याने खंडाळा पोलिस त्याचा शोध घेत आहे. खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...