आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:लग्नाचे आमिष‎ दाखवून 22 वर्षीय‎ तरुणीवर अत्याचार‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय‎ तरुणीवर वारंवार अत्याचार‎ करणाऱ्या तरुणावर अवधुतवाडी‎ पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद‎ करण्यात आला. ही घटना‎ शहरातील हॉटेल गॅनसन्समध्ये दि.‎ १५ फेब्रुवारीला सकाळी ११‎ वाजताच्या सुमारास घडली. अर्पित‎ दांडेकर वय २८ वर्ष रा. अंतरगाव‎ ता. राळेगाव असे गुन्हा नोंद‎ करण्यात आलेल्या तरूणाचे नाव‎ आहे.‎ , कळंब शहरातील २२ वर्षीय तरुणी‎ यवतमाळ शहरात शिक्षणासाठी‎ आली होती. त्या तरुणीची राळेगाव‎ तालुक्यातील अंतरगाव येथील‎ अर्पित दांडेकर या तरुणासोबत‎ ओळख झाली. त्यानंतर या दोघांचे‎ सन २०२२ पासून प्रेमसंबंध जुळले.‎ दरम्यान दोघांमध्ये शारिरीक संबंध‎ झाले. तरुणीला लग्नाचे आमिष‎ दाखवून अर्पित याने वारंवार‎ शारिरीक संबंध ठेवले. आज ती‎ तरुणी दोन महिन्याची गर्भवती‎ असून अर्पित याने तिला लग्न‎ करण्यास थेट नकार दिला. त्यावरून‎ गुरूवारी तरुणीने अवधुतवाडी‎ पोलिस ठाण्यात रितसर तक्रार‎ दाखल केली.‎