आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेगाव तालुक्यातील घटना:चाचोरा येथील 23 वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू ; पाय घसरून पडल्याचा संशय

वडकी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२३ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथील येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. भाग्यश्री रायबान मोहुर्ले (२३) रा. चाचोरा असे मृत मुलीचे नाव असून, विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथील २३ वर्षीय भाग्यश्री मोहुर्ले ही शनिवारी दुपारी विहिरीत पडुन मृत्यु झाला. भाग्यश्री ही दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावाला लागूनच असलेल्या मोरेश्वर गुरनुले याच्या शेतातील असलेल्या विहिरीवर पाणी भरून आणण्यासाठी गेली होती. परंतू एक ते दिड तास झाला तरी परत आली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. अशात गुरनुले यांच्या विहिरीवर गुंड व बादली आढळली. दरम्यान ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेत वडकी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान नागरिकांच्या मदतीने वडकी पोलिसांनी भाग्यश्री हीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. भाग्यश्री ही विहिरीतून पाणी काढत असतांना तिचा पाय घसरून तोल गेल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...