आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून 232 वर्षीय तरुणाची शस्त्राने हत्या

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरवणुकीत झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील वाणीपुरा परिसरात आलेल्या महावीर भवनजवळ बुधवारी, ४ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास घडली. प्रवीण उर्फ पीके केराम (२३) वर्ष रा. तलाव फैल, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकरी साहील रामटेके, वेदांत मानकर आणि निखिल उर्फ पीजी गौवकार आदींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाणीपुरा महावीर भवनजवळ परिसरातील हरिश मुळे, सोपान राऊत, सूरज गावंडे, काळे, आनंद कुटेगाटे, प्रवीण केराम आणि इतर मित्र देवीच्या विसर्जनानिमित्त बुधवारी रात्रीच्या सुमारास नाचत होते. यावेळी नाचताना कोणाचा तरी वाद निर्माण झाला होता. यावेळी काही मुले परिसरातील एका ज्वेलर्स दुकाना बाजूला असलेल्या गल्लीत पळाले.

दरम्यान मुले का पळ आहे म्हणून बघण्यासाठी नाचणारे तरूणही पळाले. महावीर भवनसमोर प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाणे, साहील रामटेके, वेदांत मानकर आणि निखिल उर्फ पीजी गौवकार आदींनी प्रवीण केराम याला पकडून घेराव घातला. त्यानंतर शिविगाळ सुरू केली अाणि प्रवीण याला मारूनच टाकतो अशी धमकी हर्षलने दिली. दरम्यान प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाणे यांनी त्यांच्या जवळील धारदार चाकूने प्रवीण याच्या मानेवर, पोटावर मारून गंभीर जखमी केले. तर वेदांत मानकर, साहील रामटेके आणि निखिल उर्फ पीजी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह मित्रांनी धाव घेवून प्रवीण केराम याला तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाररार्थ दाखल केले. उपचार सुरू असतांना दुसऱ्या दिवशी प्रवीणचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरिश मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाणे, साहील रामटेके, वेदांत मानकर आणि निखिल उर्फ पीजी गौवकार या पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी मुख्य मारेकरी साहील रामटेके याला एलसीबी पथकाने तर वेदांत मानकर आणि निखिल उर्फ पीजी गौवकार या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील फरार दोघांचा पोलिस शोध घेत आहे.

चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर प्राणघातक हल्ला
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने विळ्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आर्णी तालुक्यातील चिकणी (कजबा) येथे घडली असून या प्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात गुरुवारी विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. गिरिजा अविनाश इंगोले वय २३ वर्ष असे जखमी पत्नीचे नाव असून अविनाश रमेश इंगोले वय ४० वर्ष असे हल्लेखोर पतीचे नाव आहे.

क्षुल्लक कारणावरून माल-लेकावर वार
पुसद तालुक्यातील खडकदरी येथील संतोष अवसरे याने गावातील विश्वास पुताले याचे दार वाजवून पळ काढला. त्यामुळे विश्वास दार का वाजवले म्हणून विचारण्यासाठी गेला होता. यावेळी संतोष अवसरे याच्यासह चौघांनी विश्वास पुताले आणि त्याच्या आईला शिविगाळ करत कुऱ्हाड, लोखंडी पाईपने जखमी केले. याबाबत गुरुवारी पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष अवसरे याच्यासह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भोसा परिसरात ‘फायर’च्या चर्चेने खळबळ
यवतमाळ शहरातील भोसा परिसरात गुरुवारी गोळीबार झाल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच एलसीबीसह अवधुतवाडी पोलिसांनी धाव घेतली. क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याचे समोर आले असून छऱ्याच्या बंदुकीसह एकाला अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...