आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली:साखराच्या 38 वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील साखरा येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने घरातील आढ्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना १ ऑक्टोबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गणेश बद्री आडे वय ३८ रा. साखरा असे गळफास घेणाऱ्याचे नाव आहे.दिग्रस तालुक्यातील साखरा येथे गणेश कुटुंबीयासह राहत होता. शनिवारी गणेशने घरी कोणी नसताना त्याने घरातील आढ्याला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब शेजारच्यांना माहिती पडताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

त्यावरून पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर जाधव, अविनाश राठोड यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. मृतकाने गळफास का घेतला हे अजून कळू शकले नाही. पत्नी, मुले नवसाचा कार्यक्रमाला रामगाव डोर्ली येथे गेले होते.

घरी कोणी नसताना त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजून गुलदस्त्यात आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर जाधव व अविनाश राठोड करत आहे.

बातम्या आणखी आहेत...