आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा:घराच्या भिंतीखाली दबून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घराची मातीची भिंत अंगावर पडल्याने त्याखाली दबून ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पुसद शहरातील विटावा वाॅर्ड परिसरात बुधवारी रात्री घडली. प्रतिमा संतोष बुरकुले असे मृत बालिकेचे नाव आहे. तिचे आई-वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांनी प्रतिमाला सांभाळण्यासाठी नेत्रहीन वयोवृद्ध आईजवळ ठेवले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरात एकटीच खेळत असताना घराची मातीची भिंत अचानक तिच्या अंगावर कोसळली. बराच वेळ ती भिंतीखाली दबून राहिली. नंतर रुग्णालयात उपचारांकरिता नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...