आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:55 वर्षीय महिलेचा झोपेतच झाला मृत्यू ; उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात उघडकीस

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ५५ वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना शनिवार, दि.४ जूनला सकाळच्या सुमारास शहरातील उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात उघडकीस आली. अंजनाबाई सुरेश मंडलवार वय ५५ वर्ष रा. उमरसरा तिन फोटो चौक असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील उमरसरा परिसरातील तिन फोटो चौकात अंजनाबाई मंडलवार कुटूंबीयांसह राहत होती. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अंजनाबाई घरी आली होती. त्यानंतर ती घरातील खोलीत झोपली होती. बराच वेळ होवूनही अंजनाबाई झोपेतून उठली नसल्याने कुटूंबीयांनी आवाज देत पाहणी केली असता, ती मृतावस्थेत आढळून आली. यामूळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी अंजनाबाई हिच्या घराकडे धाव घेतली. याबाबतची माहिती अवधुतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपनिरीक्षक स्नेहल शेंडगे, हाके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी अंजनाबाई हिच्या शरीरावर खरचटले ल्या जखमा आढळून आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. याबाबत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अंजनाबाई हिच्या मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवधुतवाडी पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...