आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवनेरी चौकातील घट:दुकानाच्या कुलपाला फेव्हिकॉल लावून 58 हजारांची बॅग लंपास

आर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिवनेरी चौकातील एका दुकानाच्या कुलपाला फेव्हिकॉल लावून चोरट्यांनी व्यापाऱ्याची ५८ हजारांची बॅग लंपास केली. ही घटना सोमवारी दि. ३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहरातील शिवनेरी चौकात घडली.

मनोज बेलगमवार (४२) रा. माधवनगर, आर्णी यांचे शिवनेरी चौकात बिल्डिंग मटेरिअलचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते दुकानात आले.

त्यावेळी त्यांनी आपली पैसे बिल बुक व इतर कागदपत्रे असलेली बॅग दुचाकीला लटकवून ठेवली होती. बेलगमवार दुकानाचे कुलूप उघडायला गेले. मात्र कुलूपावर फेव्हिकॉल टाकलेले दिसून आले. त्यामुळे चावीने कुलूप उघडू शकले नाही. बेलगमवार बाजूच्या दुकानात पेचकस आणायला गेले, हीच संधी साधून चोरट्याने दुचाकीला लटकवलेली पैसे असलेली बॅग लंपास केली.बेलगमवार यांना पेचकस आणण्यासाठी जवळपास पाच ते सात मिनीट लागले. त्याचा चोरट्यांनी फायदा घेतला.

चोरट्यांनी नियोजितपणे लढवली शक्कल
बेलगमवार यांच्या दुकानाच्या कुलपावर फेव्हिकॉल लावलेले आढळले. त्यावरून चोरट्याने नियोजितपणे ही शक्कल लढविल्याचे दिसून येते. कुलपाला फेव्हिकॉल लावल्यामुळे कुलूप लवकर उघडले जाणार नाही, याची चोरट्याला खात्री असावी. तसेच फेव्हिकॉल काढण्यासाठी बेलग मवार इतरत्र जातील अशीही अपेक्षा असावी, चोरट्याची फेव्हिकॉलची शक्कल चांगलीच कामी आली. चोरट्याने लागोलाग बॅगवर हात साफ केला. यामुळे दहशत निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...