आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखांचा धनादेश सुपूर्द:पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना चार लाखांचा धनादेश सुपूर्द

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील आडगाव येथील ६५ वर्षीय शेतकरी हनवता मारोती ढाकरे ह्यांचा नाल्यात पाय घसरल्याने पुरात वाहून अपघाती मृत्यू झाला. ती घटना दि. ८ ऑगस्टला घडली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी हनवता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासन स्तरावरून मदत मिळावी यासाठी तहसीलदार पुसद यांच्याकडे ॲड. सुनील ढाले यांनी अर्ज केला होता. पाठपुराव्याने तात्काळ मदत मिळाल्याने आडगाव ग्राम पंचायतीच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चार लाख रुपयांचा सानुग्रह निधीचा धनादेश त्यांच्या पत्नी धुरपताबाई ढाकरे, मुलगा बाळू, संदीप यांना धनादेश दिला. यावेळी ॲड. सुनील ढाले, गावचे उपसरपंच साहेबराव चव्हाण, उमेश राठोड, सुरेश वंजारे, अतुल पवार, भगवान वंजारे, अश्वीन मुकाडे, विक्की वंजारेसह दिलीप कोलेवाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...